Tuesday, July 1, 2014

कशी समजतील? , मला ही माणसे.
कशी उमजतील? , मला ही माणसे.

हातात गंडा? , पुरोगामिचा फंडा?
कशी फसवतील?  ,  मला ही माणसे.

बोललो जर , वाणी कबीराची.
वेड्यात काढतील  , मला ही माणसे.

काढला उकरून , इतिहास यांचा?
विद्रोही ठरवतील , मला ही माणसे.

शोधतात देव , दगडात हे.
कशी पावतील?  , मला ही माणसे.

तोंडात यांच्या , शिवी लाख मोलाची.
बुध्द सांगतील? , मला ही माणसे.

चौकटीत जगणे , लाचारीचे यांचे.
जगणे शिकवतील? , मला ही माणसे.

अंधाराच्या भीतीत , भविष्य शोधणारे.
मार्ग दाखवतील? , मला ही माणसे.

कशी सुटतील? , हातून माझ्या.
कशी पुरतील? , मला ही माणसे.

कशी समजतील? , मला ही माणसे.
कशी उमजतील? , मला ही माणसे.

राहुल सिद्धार्थ साळवे



No comments:

Post a Comment