Tuesday, July 1, 2014

सांग ना माये,
तुहा देव आता कुठंय?

घर जळतय.
पोर रडताय.
आशेच्या भाकरीवर,
कण्हत कण्हत दिस काढतंय.
 सांग ना ग माये,
 तुहा देव आता कुठंय?

चार दिस झालं,
बा गेलाय.
कालपासून म्हशीन,
दुधाचा एक थेंबबी नाय दिलाय.
चारा नाय...पाणी नाय.
ईष खायलाबी, हातात पैका नाय.
बघ कसं सारं,
ओसाड ओसाड वाटतंय.
 सांग ना ग माये,
 तुहा देव आता कुठंय?

जा ना ग माये,
तुह्या देवाला  आता साकड घाल.
सांग त्याले आरडून,
काय झालाय आपल हाल.
घर कस ग बघ आपलं,
स्मशानागत वाटतंय.
 सांग ना ग माये,
 तुहा देव आता कुठंय?

राहुल सिद्धार्थ साळवे.

No comments:

Post a Comment