मी श्वास माझे ते , थांबताना पाहिले
मी त्यांनाच तुझ्यात , गुंतताना पाहिले
असतील लाख मोलाचे , चंद्र तारे जरी.
मी त्यांनाच तुझ्यात , उरताना पाहिले.
शब्द जरी कोणासाठी , खात असेल भाव.
मी त्यांनाच तुझ्यात , अडकताना पाहिले.
काटे जरी बाभळीचे , जीवघेणे सार्यांसाठी.
मी त्यांनाच तुझ्यात , सामावताना पाहिले.
ढग ते दाटलेले , बरसल्यावर खाली
मी त्यांनाच तुझ्यात , निजताना पाहिले.
तुटले होते जे? , धागे नात्यांचे.
मी त्यांनाच तुझ्यात , विणताना पाहिले.
पहाडा सारखे , मर्द जे करारी.
मी त्यानांच तुझ्यात , कोसळताना पाहिले.
तुटली होती माझी , स्वप्ने निरागस सारी.
मी त्यांनाच तुझ्यात , सजताना पाहिले.
जणू मेलेच होते , भाव माझे भाबडे.
मी त्यांनाच तुझ्यात , रमताना पाहिले.
मी श्वास माझे ते , थांबताना पाहिले
मी त्यांनाच तुझ्यात , गुंतताना पाहिले
राहुल सिद्धार्थ साळवे
No comments:
Post a Comment