Thursday, May 22, 2014

माझ्या सारखं शेम्बड पोरगं समाजकारणावर आपल मत जेव्हा मांडत.....माफ करा.....मत नको समीक्षा म्हणतो....उगाच इगोचा ईशु व्हायचा......समीक्षा मांडतो तेव्हा........समाजकारणाची, राजकारणाची आणि खरतर धर्म कारणाची व्याख्या ऐकून विचार पडतो.....एका रात्रीत कस काय कळत रे सार?....कस काय बोध होतो रे एका रात्रीत?.......कशी काय अचानक पोटात कळ आल्यागत अस्तित्वाची जाणीव व्हते ?...........सगळ विचार करायला लावणार.........अर्ध्या हळकुंडात भिजलेल, माखलेल वैचारिक, बौद्धिक नागडे पण दर्शवणार......भयाण अस वास्तव्य........विचार स्वातंत्र, व्यक्ती स्वातंत्राच्या कातड्याचा आधार घेत..............ते सारे मिरवतात ही.........स्वीकृत जाणकारांच्या साच्यात स्वतःला कस बस उतरवून.............मला तर एकच प्रश्न चावतोय........एवढी जर अक्कल आहे यांना तर हे इथे का बसलेत लाळ गाळत?......का हे पडद्या मागचे प्यादे आहेत......?........कि सोशल नेट्वर्किंग चा स्टेटस याचं मोठेपण ठरवतो?..........like coment याचं समाजातल स्थान ठरवत? की खाजवून होणार्या खारुजाच copy rights यांच्या कडे आहे? काय कळेनास झालंय........गैबाने काल ओकलेल विसरतात.......ते तरी आधी पुसावं आणि नंतर बोट घालाव.......घश्यात रे.......वैचारिक गरळ ओकायला............कारण माझ्यासारखे उपट सोंडे.....सुकलेल पण खरडून बघतात.......हे लक्षात ठेवा .........आपल म्हणून सांगतो........नागड्याने आरशाची भीती ठेवावी.......सौंदर्याचे दर्शन तर आंधळ्यालाही होते........बाकी मग ज्याची त्याची मर्जी.........आणि स्टाईल......वैचारिक नागडेपण मिरवण्याची.........जसे मी आता मिरवले.....आरसा झाकून.......बिनधास्त...........कारण माझी अक्कल एवढीच आहे.......माझ्या आरशाने ठरवलेली.

राहुल सिद्धार्थ साळवे

No comments:

Post a Comment