Sunday, May 25, 2014

आहे......

मनोसक्त आज मला, जगायचे आहे.
एकट्यात का असेना, रमायचे आहे.

कुठे मागत बसू, स्पर्श उसना कोणाला?
मलाच माझ्या स्पर्शाने, शहारायचे आहे.

आनंद पावसाचा, नेहमीच घेत आलो,
आसवात माझ्याच ओलेचिंब, भिजायचे आहे.

मनोसक्त आज मला, जगायचे आहे.
एकट्यात का असेना, रमायचे आहे.

प्रेममित्र

No comments:

Post a Comment