Saturday, November 1, 2014

पसरून...
पदर...
त्या आभाळ।कड़े...
काय मागतोय?
हा माणूस...
ज्याची...
झोळीच...
शिवलेली आहे...
भोक...
पडलेल्या...
ठिगळ्यांनी...
त्या...
पदरात...
उरेल काय?...
डोळ्यातल चांदण?...
जगण्यातल रडण?...
की...
वर्षानुवर्ष...
हात पसरून...
मागितलेल मागण?...
काय उरेल?...
अरे...
घाल हात...
थेट त्या...
आभाळ।च्या...
पोटात...
घश्यात...
नाका तोंडात...
आणि घे...
जे तुला...
पाहिजे आहे...
ते...
जन्मजात...
मिळते त्यावर...
हक्क...
अधिकार...
मागायचा नसतो...
तो...
मिळवायचा असतो...
नाहीतर...
तो पदर...
ताणून ताणून...
फाटेल अखेर...
चिंध्या...
होतील त्याच्या...
पण हे...
समाजरूपी...
आभाळ...
तुझ्याहाती...
काही...
लागू...
देणार नाही...
त्या आधीच...
तू घाल...
त्या...
आभाळ।त हात...
आणि घे....
काढून...
जे...
तुझ...
आणि...
तुझच आहे...
तेही...
जन्मजात...

No comments:

Post a Comment