Saturday, November 1, 2014

बरखास्त केलीत त्यांनी, 
आमची तत्वे.
आमच्या बिनबुडाच्या वैचारिक चौकटीत, 
कोंडतो म्हणे, 
त्यांचा श्वास. 
किळस वाणे वाटते त्यांना,
आमचे उघड्यावरचे जिणे.
खटकते त्यांना,
आमचे वास्तववादी बोलणे.
पांगळे करतो म्हणे आम्ही,
त्यांच्या गोजिरवाण्या साहित्याला.
मग बसा गोंजारत त्याला,
लाली पावडर लावत.
आम्ही अशीच खरडणार,
आमची लेखणी.
भाकरीचा माग काढत,
तुम्ही बांधलेल्या,
स्वार्थी भिंती,
उध्वस्त करत.
आम्ही जळून संपलो तरी चालेल यात.
पण समतेच्या माशालिनी,
उद्याचा परिवर्तनवादी सूर्य,
उगवल्याशिवाय राहणार नाही.

No comments:

Post a Comment