ती उजाडलेली पहाट,
पुन्हा स्वाधीन होत आहे.
त्या अंधाराच्या कुशीत.
कधी जातीच्या,
कधी मातीच्या,
तर कधी शाळेत शिकवलेल्या,
खोट्या इतिहासाच्या रुपात.
पुन्हा स्वाधीन होत आहे.
त्या अंधाराच्या कुशीत.
कधी जातीच्या,
कधी मातीच्या,
तर कधी शाळेत शिकवलेल्या,
खोट्या इतिहासाच्या रुपात.
तो लिंग भेदाचा,
तो वर्ण भेदाचा,
खाजवून खरूज करणारा,
माणूसरूपी भस्मासुर,
पुन्हा जन्म घेत आहे,
त्याच्याच धर्मखानी,
मर्मखानी,
त्या आखलेल्या,
अस्तित्वहीन जगण्याच्या उरात.
तो वर्ण भेदाचा,
खाजवून खरूज करणारा,
माणूसरूपी भस्मासुर,
पुन्हा जन्म घेत आहे,
त्याच्याच धर्मखानी,
मर्मखानी,
त्या आखलेल्या,
अस्तित्वहीन जगण्याच्या उरात.
सोयीनुसार,
गरजेनुसार,
योग्यतेनुसार,
रोज बदलत जाते ती,
धर्माची,
रंगाची,
कुबट वास येणारी व्याख्या.
गरजेनुसार,
योग्यतेनुसार,
रोज बदलत जाते ती,
धर्माची,
रंगाची,
कुबट वास येणारी व्याख्या.
फाट्यावर मारतो तो,
पास होण्यापुरती,
त्याला शिकवलेली जाणीवतेची गोष्ट.
जी आज विखरली आहे.
विभागली आहे.
सर्व इंद्रिय असणार्या,
त्याच्याच सारख्या लोकांत.
तेही त्याचे मोजमाप होण्यासाठी.
पास होण्यापुरती,
त्याला शिकवलेली जाणीवतेची गोष्ट.
जी आज विखरली आहे.
विभागली आहे.
सर्व इंद्रिय असणार्या,
त्याच्याच सारख्या लोकांत.
तेही त्याचे मोजमाप होण्यासाठी.
कदाचित यालाच म्हणतात,
नेमकी ती, आरक्षणाची परिभाषा.
जी आज त्याला,
त्याच्या अस्तित्वापेक्षा,
मोठी वाटू लागली आहे.
त्यानेच मांडलेल्या बाजारात,
त्याचाच श्वास कोंडताना,
तोही माणूस म्हणून.
पण नावापुरताच.
नेमकी ती, आरक्षणाची परिभाषा.
जी आज त्याला,
त्याच्या अस्तित्वापेक्षा,
मोठी वाटू लागली आहे.
त्यानेच मांडलेल्या बाजारात,
त्याचाच श्वास कोंडताना,
तोही माणूस म्हणून.
पण नावापुरताच.
No comments:
Post a Comment