Saturday, November 1, 2014

तू कोण आहेस?
माझी जात ठरवणारा.
माझा धर्म सांगणारा.
मी त्या प्रत्येकाला पुजतो,
ज्याने मानवतेचा पुरस्कार केला.
ज्याने काल्पनिक बांडगुळ।ला ठेचुन,
विज्ञ।नवादी फिनिक्स जन्माला घातला.
जो निसर्गाचा नियम,
प्रयोगाअंती सिद्ध करुनच मानतो.
त्या स्त्रीवादी,
बुळचट पुरुषप्रधान विचारधारेला,
अभ्यासपूर्ण चर्चेतून,
घातलेला चष्मा उतरवून,
रंगवलेला चेहरा तोंडावर पाडून,
जो नागडेपण उघडे पाडतो,
मी त्या प्रत्येकाला पुजतो.
मग ते कबीर असो.
बुध्द असो.
तुकाराम असो,
वा ज्ञ।नेश्वर असो.
मी त्यांच्या प्रत्येक सिद्धांत़ाला,
प्रत्येक समीकरणाला,
प्रत्येक दूरदृष्टी...डोळस,
तेजोमय विचारसरणीला पुजतो.
ठरव आता यात तू कुठे बसतो ते.
आणि मग सांग मला,
तुझ्या लेखी असलेली ती,
जातीची...धर्माची,
बंदिस्त झालेली,
समीक्षा.

No comments:

Post a Comment