Saturday, November 1, 2014

कसा बदलला हा माणूस?
सायकोलॉजिच्या जंजाळ।त,
हातपाय मारत,
नाका तोंडात पाणी जाऊ नये म्हणून,
तरंगतच राहिला, बुडण्याच्या भितीने.
या सोफ़स्टिकेटेड गढूळ डबक्यात.
त्याच्या त्याने जन्माला घातलेल्या म्हणी,
वाक्प्रचार,
काळ्या दगडावरची, त्याने कोरलेली विधान,
त्याच्या सोयीनुसार त्यान नमूद करून ठेवलीत.
कदाचित भूतकाळ।चा पुरावा म्हणून.
उपसतो तो तेच शस्त्र म्हणून.
त्याच्या सारखाच कोणी त्याला,
वातावरणाच्या हवेत,
तोंडाच्या वाफा मिसळणारा भेटल्यावर.
मुखशुद्धीसाठी बडीशेप चघळणारा मला,
चोथा करणार्यानच्या जमातीतलाच वाटतो.
कामसूत्र आणि अश्लील चित्रफतिंचा,
अंधारात मनमुराद आनंद घेणारा माणूस,
त्याला सेक्सोलॉजिच आधार देतो तेव्हा,
खुडुक झालेल्या कोंबडीची मला,
त्याला उपमा द्यावी वाटते.
यात माझी काय चूक?
तो माणूस बदलला तर,
त्याला जाऊन विचारा,
बदलण्याच कारण,
आणि राजकारण.
जा जाऊन विचारा.

No comments:

Post a Comment