Saturday, November 1, 2014

आक्रोश हा...
डोळ्यातला...
मुक्यातला...
अंधारातला...
शब्दाविना...
कानठळ्या बसवणारा...
असा हा...
आक्रोश....
कधी भुकेचा...
कधी अन्यायाचा...
कधी विश्वास घाताचा...
तर कधी...
लाभलेल्या...
गोजिरवाण्या जन्माचा...
वाहणाऱ्या रक्तात...
दाता ओठात...
बंद हातात...
ठायी ठायी...
बोंबलणारा...
असा हा...
मुका आक्रोश...
त्यातूनही जगतोय...
रोज नव्याने...
खोटी आशा...
मनाशी कवटाळुन...
मुखवटाधारी...
हा माणूस...
बदलेल काहीतरी...
कधीतरी...
ही स्वतःचीच...
समजूत काढत...
गळl फाडून...
ओरडणाऱ्या...
रडणाऱ्या...
जिवंत मुडद्यांच्या...
पंक्तीत बसून...
करेल तरी काय?
कारण...
यालाच ते जाणकार...
आयुष्य...
जीवन...
जगणे म्हणतात...
हो...
तेच जगणे...
जे तुम्ही जगता...
या मुक्या आक्रोशात...
तेही...
अगदी आनंदाने...
जगा मनसोक्त...
आणी मरा एकदिवस...
हा जगण्यासाठी...
दाबुन धरलेला...
आक्रोश घेउन...
हसत हसत...
लाजिरवाण्याऩे...
जगण्याआधीच...

No comments:

Post a Comment