दमलोय शोधून अंधारात,
स्वप्न ते.
ज्याने खोट्या आशेने माझे,
सूर्य लपवून ठेवले आहेत.
कसली गोजिरवाणी रे,
गोष्ट तुझी त्या स्वप्नांची?
ज्याने माझ्या आत्मविश्वासाचे,
वाभाडे काढलेत.
रोज तोंडघशी पाडतात मला ते,
त्यांच्या शोधात ,
माझ्या पायाचे तळवे झिजताना.
रक्त आटले पार माझे,
तुझ्या त्या स्वप्नांच्या नादात.
फसवलस तू मला सांगून,
की, " स्वप्नांच्या मागे धाव" म्हणून.
मी सोडून दिलंय आता सगळं .
आता मीच माझे स्वप्न ठरवणार.
आणि त्याच्याच मागे धावणार.
भले तू मला भावनाशुन्य म्हण.
पण नको आता मला ही तुझी अशी ,
खोटी भुरळ घालणारी टोचणी
नाही जिंकणार मी कदाचित.
पण हरणार ही नाही.
बघच तू आता,
तुझ्या बिनबुडाच्या मृगजळाला,
गालबोट लावतो की नाही ते.
बघच तू आता.
स्वप्न ते.
ज्याने खोट्या आशेने माझे,
सूर्य लपवून ठेवले आहेत.
कसली गोजिरवाणी रे,
गोष्ट तुझी त्या स्वप्नांची?
ज्याने माझ्या आत्मविश्वासाचे,
वाभाडे काढलेत.
रोज तोंडघशी पाडतात मला ते,
त्यांच्या शोधात ,
माझ्या पायाचे तळवे झिजताना.
रक्त आटले पार माझे,
तुझ्या त्या स्वप्नांच्या नादात.
फसवलस तू मला सांगून,
की, " स्वप्नांच्या मागे धाव" म्हणून.
मी सोडून दिलंय आता सगळं .
आता मीच माझे स्वप्न ठरवणार.
आणि त्याच्याच मागे धावणार.
भले तू मला भावनाशुन्य म्हण.
पण नको आता मला ही तुझी अशी ,
खोटी भुरळ घालणारी टोचणी
नाही जिंकणार मी कदाचित.
पण हरणार ही नाही.
बघच तू आता,
तुझ्या बिनबुडाच्या मृगजळाला,
गालबोट लावतो की नाही ते.
बघच तू आता.
No comments:
Post a Comment