Saturday, November 1, 2014

आज भले तुझ्या दारी,
कंदिलाची दिवाळी आहे.
पण ज्यांच्या खूंटीला,
रोज असतो कंदील,
त्यांचे काय सांग?
तुझ्या श्रीमंतीच्या माजापायी,
जाळतोस का ती दारू?
की ज्यांची आतडी जळली आहेत?
भुकेपायी?
त्यांचा जिव जाळतोय तू?
सांगच आज तू,
काय आहे तुझी दिवाळी?
रोज मरत मरत जगणाऱ्या त्या,
जिवंत माणसानकडे बघ.
रोज होते त्यांची दिवाळी.
खूंटीला कंदील लावून.
चुलीपुढं जगणं जाळून.
आणि माथी,
त्या चंद्र तार्यांची तोरणं लावून.
तुला नाही जमणार ते.
कारण त्यासाठी जगावे लागते.
नुसते जिवंत असून भागत नाही.
कळले का?
आता मिरव छातीठोक पणे,
तुझी दिखावू,
खोटी दिवाळी.
मिरव.
जिवंत मुडद्या,
आनंदात मिरव.

No comments:

Post a Comment